ग माय माझी।।

आई तुझी माया,देवीची तू छाया,
प्रेमळ तुझी काया,ग माय माझी।।
नऊ महीने नऊ दिवस,आधी पोटात वाढविलेस।
जीवनाच्या प्रत्येक पायरीवर,जगायला शिकवलेस।
भुकेल्या पोटी मला सावरलेस,ग माय माझी।।
खुप काही केले,तू आम्हा लेकरांसाठी,
नशिबवान मि जन्म घेतला तुझ्या पोटी,
भूक भागवायला आमची,तू खनलिस माती,
पायाला तुझ्या चरे दिलेस आमच्यासाठी,ग माय माझी।।
स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी,
लेकरांच्या भुकेसाठी ती बनते शिकारी
ओंजळ तिची रहते नेहमीच रिकामी,
पन राहत नाही कधीच ती बिनकामी,ग माय माझी।।
नमस्कार माझा सदैव तुझ्याच चरणी,
चालीन मी नेहमी तुझ्याच वळणी,
कधी प्रेमळ कधी कणखर तुझी राहणी,
तूच माझी जीवनवाहिनी,ग माय माझी।

Comments