सत्य कथा

मला काय करु काय बोलू सूचलेच नाही,जेवायला बसले होते तितक्यात माझ्या मैत्रीणिचा कॉल आला।रडत होती।कसेबसे तिला शांत केले।आणि कारण जानूँ घेण्याच प्रयत्न केला।
Lockdown मुळे ती आणि तिच्या नवरयामुलासोबत सासु सासरेचा घरी गेली,मुळात तिला जायचे नव्हते पण बाळाला आजीआजोबांच प्रेम मिळेल,म्हणून गेली,ती मुंबई ला राहते,सासुसासरे हरयाणा ला राहतात,थोडक्यात शिक्षितच ते.मुंबईमधे असताना तिचा नवरा तिला दारू पिउन मारहाण करायचा,तिने तिच्या आईबाबाना सांगितले पन ते जुन्या विचारांचे,एकच गोष्ट म्हणतात अगदी नव्र्यने मारून जरी टाकले तरी शेवट पर्यंत त्याचासोबत संसार करायचा,नाहीतर लोक आमच्या तोंडात शेन घालतील की मुलगी नवर्याचा मार सहन नाही करु शकली आणि तलाख दिला।त्यात तिला छोटेसे बाळ,तिने जॉब करायचा ठरवले तरी कुठे करणार,या कोरोना मधे तर तिला घरी बसून जॉब शोधतेय ती,पन तिला मिळत नाही आणि कारण के देतात की तुम्हाला बाळ आहे तुम्ही कसा करणार काम,म्हणून टी थकलिय खुप,डिप्रेशन मधे गेलीय,

आज तिचा कॉल आला तेव्हा सांगू लागली,तिला तिची सासु म्हणाली तुम्ही तिघे इकडे निघुन या,मी माझ्याइथे तर बिल्कुल त्याला एक थेम्ब पन दारू नही पिउन देणार,तुम्ही सगळे या,त्याला मि बघते कशी दारू पितो,म्हणून ऐकले तिने,तिथे गेल्यावर पन त्याने तिला मारहाण केली,तिशी सासु ऑफिस मधे जॉब करते,तिने तिला msg केला तर तिच्या सासुने तिच्या मुलाला कॉल केला आणि म्हणाली की तिला संग मी ऑफिस मधे आहे मला नको कॉल करु,तो तिला काहीही घाण घाण बोलत होता,तिने रागारागाने बैग भरली आणि घर सोडून जायला निघाली,तिच्या सासुने तिला कॉल केला आणि म्हणाली की आमची इकडे सगळे इज्जत करतात तू कबाड़ आहेस आमची इज्जत नको घालऊ,तिला राग आला आणि म्हणाली की तुमची इतकी इज्जत आहे मग तुमचा मुलगा मला घाण शिव्या देतोय,काहीही घाण बोलतोय मग तेव्हा तुमची इज्जत नाही का जात,इतकी इज्जत तुम्हाला आहे तर मग मुलाला बायकोची इज्जत करने नाही शिकवले का,तर म्हणाली की ते सगळे माला माहित नही तुला जायचे आहे ना,मि घरी आल्यावर तुझ्या आईबापाला फोन कर मग ते हो म्हणाले की जा,पण टी बिचारी के करणार आइवडिल जुन्या विचारांचे,तिने विचार केला राहु आणि लवकर कसेतरी प्रयत्न कर जायचे,ऐसे करत एक महीना गेला.....

आज तिचा कॉल आला म्हणाली माझ्या पतीने दारू आणली आहे आणि जेव्हा मि माझ्या सासुला विचारले की तुम्ही तर म्हणाले होतात की मि एक थेम्ब पन नही आनून देणार आणि है तर 2 बोटल घेऊन आला तेव्हां माझ्यासमोर बोलली की असा कसा मुलगा मिळाला आहे मला,त्याचासोबत यापेक्षा बेकार होईल,आणि तिथुन वर टेरेस वर गेली,तिथे तो दारू पित बसल होता,हिला 5 मिनट ने माझी मैत्रीण पन वर गेली चादर आणायला,तर हिने सीढ़ी चढ़त होती तेवढ्यात ऐकले की तिची सासु तिच्या मुलाला(मैत्रीणिच्या पतीला) बोलत होती की टी माझे डोके खातेय खाली की त्याला कशाला दारू कानून दिली,मला घालून पाडुन बोलते,तिला सांग माझे डोके नको खाऊ,ती तशी रडत रडत मला कॉल केला,मी है ऐकून मला पहिला विचार आला,जर तिच्या सासुला माहित आहे तिचा मुलगा तिच्या सुनेला किती मारतो,तर मग का स्वतःच्या मुलाला भडकवावे,त्यात जाणीव झाली मला तिला मुलगी नाही दिली देवाने मग तिला के माहित मुलीचे सुख। दुसर्याची लेक घरात आणली टी फक्त नोकर म्हणून काम करायला का????? शिक्षित म्हणतात स्वत:ला म्हणे इज्जतदार आहे,है घरच्या लक्ष्मीला त्रास देऊन। बाहेरच्या लोकांना तुम्ही कैसे वागता है माहित नसेल म्हणून इज्जत देट असतील,वागुन बघा बाहेरच्याणसमोर असे आपल्या सुनेसोबत,म्हणजे कळेल तुम्ही किती इज्जत देण्याच्या लायकीचे.....
मला तिचे है सर्व ऐकून दुःख होतेय,ती काय परिस्थितितुन जाते याचा विचार करुनच अंगावर शहारे येत आहेत,अश्या परिस्थितीत डिप्रेशन येईलच ना,मी तिथे तिच्या जवळ नाही म्हणून मी तिला सावरु नाही शकत,पण मी तिला आधार देण्याचा प्रयत्न करते आहे,स्वत:वर राग येतोय की मि तिच्यासाठी काही करू शकत नाही या पलीकडे......मी देवाला एकच प्रार्थना करेल की देवा तिच्यात खुप टैलेंट आहे,तिला कोणतेही काम ती मन लावून करते,शिवाय जॉब करत होती तेव्हापन आमच्यापेक्षा ती पुढे होती,एक्सपेरिएंस आहे तिला इतका,आणि लग्न करवुन घरच्यानी वाटोले केले,बाप्पा,प्लीज तिला चांगला जॉब लागूदे आणि टी या नरकातुन सुटू देत।प्लीज् तुम्ही ही तिच्या साठी प्रार्थना करा☹️🙏🙏

#storytime #RealStory

Comments

  1. Sad but bitter reality of life. I pray everyone's daughter must have beautiful and peaceful life.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts